सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 विश्लेषण

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

डिजिटल पुणे    08-10-2026 10:22:14

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. नटसम्राट नानांची अशी आकस्मिक एक्झिट धक्कादायक आहे, अशी शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी घेतलेली भूमिका कलाक्षेत्रासह, अनेकांना सामाजिक बांधिलकीचा धडा घालून देणारी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्नेही, मित्र म्हणून नानांचे घट्ट ऋणानुबंध राहीले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीला नानांच्या रुपाने मराठी मातीतील रांगडा, पण तितकाच संवेदनशील असा अभिनेता मिळाला. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

नाना जिथे जात तिथे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा भारदस्तपणा वातावरण भारून टाकत. नानांचे अस्तित्त्व त्या परिसराला व्यापून टाकत असे. नाना सर्वांशीच हक्काने आणि वडिलकीच्या, मार्गदर्शकाच्या नात्यानं बोलत असत. त्यामध्ये आत-बाहेर असा भाव नसे. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधता येत असे.

परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरे आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पाटेकर कुटुंबियांच्या, नानांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


 Give Feedback



 जाहिराती