सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 DIGITAL PUNE NEWS

“रात्री अडीच वाजता तब्येत बिघडल्याचा मेसेज…”मित्राने पाहताच धाव घेतली; बेशुद्ध अवस्थेत सापडले नाना पाटेकर, ४५ मिनिटं CPR देऊनही प्राण वाचवता आले नाहीत

डिजिटल पुणे    08-10-2026 10:33:25

गोवा :  आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेते म्हणूनच नव्हे, तर आपल्या आगळ्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणारे कलाकार म्हणून ओळखले जात होते. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मराठी आणि हिंदी चित्रपटांपर्यंत पोहोचला. त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पहाटे मित्राला केला मेसेज

नाना पाटेकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी आपल्या एका मित्राला संदेश पाठवला होता. या संदेशातून त्यांनी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र मित्राने हा संदेश काही वेळाने पाहिला. मेसेज पाहताच त्याने नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तातडीने त्यांच्या गोव्यातील निवासस्थानी धाव घेतली.

नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पाउला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये केअरटेकरसोबत राहत होते. मित्र त्यांच्या घरी पोहोचला असता नाना बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं.

रुग्णवाहिकेतच उपचार सुरू

रुग्णालय जवळ असल्याने नाना पाटेकर यांना तातडीने रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले.नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे CPR दिला. मात्र एवढे प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही

नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याची माहिती समोर आली असली, तरी मृत्यूचं नेमकं वैद्यकीय कारण अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकलाकार आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांसह पद्मश्रीचा सन्मान

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयातील ताकद, संवादफेक आणि पात्रात पूर्णपणे सामावून जाण्याची शैली यामुळे त्यांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. मराठी रंगभूमीपासून सुरू झालेल्या त्यांच्या अभिनयप्रवासाने पुढे हिंदी सिनेमातही मोठं यश मिळवलं.

अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते. याशिवाय भारत सरकारने २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची साक्ष देतात.

नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने एका प्रभावी आणि वेगळ्या शैलीच्या अभिनेत्याचा प्रवास अचानक थांबला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही चाहते आणि कलाकारांकडून दुःख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या अभिनयाची शैली, दमदार आवाज आणि लक्षात राहणारी पात्रं यामुळे नाना पाटेकर यांची उणीव कायम जाणवत राहणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती