सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 DIGITAL PUNE NEWS

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच धावला मल्हार; नाना पाटेकरांच्या जाण्याने मुलगा पूर्णपणे खचला, रुग्णालयात पोहोचताच अश्रू अनावर

डिजिटल पुणे    08-10-2026 13:19:41

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी गोव्यात त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना जाणवल्यानंतर त्यांच्या गोव्यातील घरी वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार करून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती समोर आली.

नानांच्या निधनाची माहिती सर्वप्रथम त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने दिली. वडिलांच्या निधनाचं वृत्त समजलं त्यावेळी मल्हार आणि कुटुंबीय पुण्यात होते. बातमी कळताच मल्हार कुटुंबीयांसह गोव्याच्या दिशेने रवाना झाला.

माध्यमांशी बोलताना मल्हारने नानांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. सुरुवातीला या बातमीवर विश्वास ठेवणंही कठीण झालं होतं, मात्र अखेर ही दुःखद बातमी खरी असल्याचं त्याने सांगितलं. गोव्याला पोहोचल्यानंतरच नानांच्या निधनाबाबतची सविस्तर माहिती मिळेल, असंही मल्हारने स्पष्ट केलं.वडिलांच्या निधनाची माहिती देताना मल्हार प्रचंड भावुक झालेला दिसला. बोलताना त्याला शब्दही सुचत नव्हते. वडिलांच्या जाण्याने त्याला मोठा धक्का बसल्याचं त्याच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत होतं.

नानांचं पार्थिव पुण्यात आणणार

कुटुंबीय गोव्यात पोहोचल्यानंतर नाना पाटेकर यांचं पार्थिव पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दुपारनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात आणलं जाणार असल्याची माहिती मल्हारने दिली आहे. त्यानंतर कुटुंबीय आणि चाहत्यांना अंत्यदर्शन घेता येणार आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाना आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांना मल्हार हा मुलगा आहे. नाना आणि नीलकांती यांनी १९७८ मध्ये विवाह केला होता. पुढील काळात दोघे स्वतंत्रपणे राहत होते. मल्हारचा आपल्या वडिलांशी असलेला संबंध मात्र कायम राहिला.

नानांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं पर्व संपलं आहे. त्यांच्या अभिनयाची अनोखी शैली, संवादफेक आणि सामाजिक जाणिवांसाठी ते कायम स्मरणात राहतील. मात्र, पडद्यावरचा हा दमदार अभिनेता आज आपल्या कुटुंबीयांना आणि असंख्य चाहत्यांना कायमचा सोडून गेला आहे.


 Give Feedback



 जाहिराती