सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत राडा सुरूच, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 शहर

नाना पाटेकर यांच्या निधनाने समाजमनाचीही मोठी हानी; सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांची भावपूर्ण आदरांजली

डिजिटल पुणे    08-10-2026 15:46:17

पुणे : महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कला क्षेत्रासोबतच समाजमनावरही शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर सामाजिक प्रश्नांवर परखडपणे व्यक्त होणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती.

नाना पाटेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाशी असलेले नाते जपले. सामान्य माणसांचे प्रश्न, शेतकरी, गरिबी, बेरोजगारी आणि माणुसकी यांसारख्या विषयांवर त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली. सत्ताधारी किंवा मोठ्या व्यक्तीसमोरही सामाजिक प्रश्न मांडण्याचे धाडस त्यांनी कायम दाखवले.

“नाना पाटेकर यांनी केवळ अभिनय केला नाही, तर आपल्या शब्दांनी समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले. संघर्षातून उभे राहिलेल्या या कलाकाराने कलेसोबतच सामाजिक बांधिलकीही जपली. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाच्या प्रश्नांवर स्पष्टपणे बोलणारा संवेदनशील आवाज हरवत असताना नानांची सामाजिक जाणीव अधिक प्रकर्षाने आठवते,” अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नाना पाटेकर म्हणजे केवळ पडद्यावरील एक दमदार कलाकार नव्हे, तर समाजातील वास्तवावर भाष्य करणारा आणि माणुसकीची जाणीव जपणारा संवेदनशील आवाज होता. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली असल्याची भावना प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केली.“नाना पाटेकर यांना भावपूर्ण आदरांजली!” असे म्हणत प्रशांत कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


 Give Feedback



 जाहिराती