पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान सविता मराठे यांना प्रदान करण्यात आला. चव्हाण सेंटरच्या वतीने पुणे केंद्र चे सचिव अंकुश काकडे तसेच कोषाध्यक्ष विशाल तांबे ,केतनकुमार पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संस्थेच्या वतीने त्यांना पुण्यात सन्मानित करण्यात आले. सेंटर चे अध्यक्ष शरद पवार , कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, सरचिटणीस हेमंत टकले यांनी सविता मराठे यांचे अभिनंदन केले.
मराठे यांनी जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारांमध्ये आजपर्यंत अविरत कार्य केलेले आहे .त्यांना 1982 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच 2014 मध्ये त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्काराने पुन्हा एकदा सन्मानित करण्यात आले.त्यांच्या जवळपास तीन विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या रेफ्री आणि विशेष करून जज म्हणून त्या काम करतात