सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ऑगस्ट 2027 पर्यंत महापालिकेचे नियोजन
 क्राईम

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आईचीच ३९ लाखांची मागणी; सोलापुरात दोन महिला अटकेत

डिजिटल पुणे    15-10-2026 11:07:38

सोलापूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित मुलीच्या आईनेच आरोपीच्या पत्नीकडे तब्बल ३९ लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार सोलापुरात समोर आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीची आई आणि अन्य एका महिलेविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही महिलांना ताब्यात घेत अटक केली आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील दीपक राजगुरू याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जुलै २०२६ मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने आरोपीच्या पत्नीशी संपर्क साधला. संबंधित गुन्हा मागे घेण्याची तयारी असल्याचे सांगत तिने त्यासाठी ३९ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

आरोपीच्या पत्नीने पोलिसांना दिली माहिती

पीडित मुलीच्या आईकडून पैशांची मागणी करण्यात आल्याची माहिती आरोपीच्या पत्नीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची पडताळणी केली आणि संबंधित महिलांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, आरोपीच्या पत्नीच्या माध्यमातून पैसे देण्याची योजना आखण्यात आली.

२५ हजार रुपये स्वीकारताना पोलिसांची कारवाई

पोलिसांच्या नियोजनानुसार, आरोपीच्या पत्नीने पीडित मुलीच्या आईला २५ हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरल्याची माहिती आहे. संबंधित दोन्ही महिला पैसे मोजत असताना पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघींनाही अटक करण्यात आली.

या प्रकरणी पोक्सो गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून दोन्ही महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती