सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या
  • रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
  • अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या
 जिल्हा

मौजे पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

डिजिटल पुणे    17-10-2026 13:29:46

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यालयामुळे पिकुळे येथील नागरिकांना महसुली कामकाजासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सातबारा उतारा, विविध दाखले तसेच अन्य महसुली सेवांसाठी अधिक सुलभतेने संपर्क साधता येणार असून, स्थानिक पातळीवर प्रशासकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, पशुसंवर्धन उपयुक्त समीर बिलोलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासह दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव, भेडशीचे मंडळ अधिकारी सचिन गोरे, पिकुळे ग्रामपंचायतीचे सरपंच आपा     वसंत गवस, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर आणि ग्राम महसूल अधिकारी स्मिता परब उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन कार्यालयामुळे गावातील महसुली कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


 Give Feedback



 जाहिराती