सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या
  • रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
  • अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या
 जिल्हा

पत्रपरिषदः दुष्काळी उपाययोजना करतांना जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डिजिटल पुणे    17-10-2026 13:49:09

छत्रपती संभाजीनगर  – दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करतांना जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

श्री. आठवले आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुकुंदवाडी परिसरातील जिमखाना क्लब येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण या यावेळी उपस्थित होत्या. केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, यंदा सुरुवातीला पाऊस झाला; मात्र त्यानंतर पावसात खंड पडल्याने अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार  आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे श्री. आठवले यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करतांना जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नद्यांवरील धरणे आणि जलसंपत्तीच्या नियोजनाबाबत दूरदृष्टीपूर्ण विचार मांडले होते. त्यानुसार उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, जलसाठ्यांचे संवर्धन आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे श्री. आठवले यांनी सांगितले.

श्री. आठवले यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धनालाही महत्त्व देण्याची आवश्यकता असून, भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून दीर्घकालीन आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. आठवले यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती