सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड! सूरत एक्स्प्रेसमधून संशयित ताब्यात, राजस्थानमध्येही पोलिसांची कारवाई
 शहर

पुण्यात २५ ऑक्टोबर रोजी ज्ञानवर्धक ज्योतिष मेळावा

डिजिटल पुणे    19-10-2026 11:23:48

पुणे :गौरीकैलास ज्योतिष संस्था पुणे आयोजित पाचवा ज्ञानवर्धक ज्योतिष मेळावा रविवार दि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे सहा या वेळेत प्रेसिडेंट हॉटेल , प्रभात रस्ता, पुणे  येथे होणार आहे. ज्योतिष विषयक विषयांवर चर्चासत्रे, मार्गदर्शन, प्रश्नमंजुषा, प्रमाणपत्र वितरण, पुस्तक प्रकाशन असे अनेक कार्यक्रम या मेळाव्यात होणार आहेत ,अशी माहिती गौरी कैलास ज्योतिष संस्थेच्या संस्थापक गौरी केंजळे आणि कैलास केंजळे यांनी दिली .या मेळाव्याचे हे पाचवे वर्ष आहे

 भालचंद्र ज्योतिर्विद्यालय ,स्मार्ट अॅस्ट्रॉलॉजर्स पुणे ,वागेश्वरी ज्योतिष कार्यालय ऑरा कन्सल्टन्सी ,ज्योतिष सिंधू असोसिएट पुणे, श्री दत्तकृपा ज्योतिष कार्यालय बेळगाव कारवार आणि अक्षया ज्योतिष केंद्र अशा अनेक संस्था सहभागी होणार आहेत.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवचनकार गुरुश्री प्रिया मालवणकर  यांच्या हस्ते होणार असून   अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे

 ज्योतिषरत्न  नंदकिशोर जकातदार हे अध्यक्षस्थानी असतील. सौ. पल्लवी चौहान स्वागताध्यक्ष असतील. प्रास्ताविक  कैलास केंजळे करतील. पंडित विजय जकातदार  यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित असतील.या मेळाव्यात  कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार 2026  अॅस्ट्रोगुरु डॉ .सौ. ज्योती जोशी (जळगाव) यांना देण्यात येणार आहे.विशेष अतिथी म्हणून पं .विजय जकातदार, लाल किताब महागुरु कुँवर जी, कांतिलाल मुनोत, सौ. पुष्पलता शेवाळे, डॉ .सौ जयश्री बेलसरे ,अष्टक वर्ग महागुरु प्रदीप पंडित ,डॉ .सीमा गाडेकर ,वास्तुमहर्षी  रमेश पलंगे उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यात ज्योतिष अभ्यास विषयक अनेक सत्रे होणार आहेत. सर्व सहभागींसाठी ज्योतिष प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.समारोप सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती