सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इटलीत Gen-z आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार; आईवडिलांकडून वसूल केली जाणार नुकसान भरपाई, मेलोनी यांचा मोठा निर्णय !
  • जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
  • उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
 क्राईम

छत्रपती संभाजीनगरमध्ये दांडिया खेळताना वादाचा भडका; लोखंडी रॉडने हल्ला करत जिवलग मित्राची हत्या

डिजिटल पुणे    21-10-2026 11:36:55

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवादरम्यान दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे घडली. आठ वर्षांपासून एकमेकांचे जिवलग मित्र असलेल्या दोघांमधील मैत्रीचा शेवट रक्तरंजित झाला. नशेत असलेल्या मित्रानेच लोखंडी रॉडने हल्ला करून तरुणाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुष्कर सतीष गाडे असे मृत तरुणाचे नाव असून, महेश पवार उर्फ भोऱ्या असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्कर गाडे हा आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत संघर्षनगर परिसरात राहत होता. त्याचे वडील टेम्पोचालक आहेत. पुष्करने महिनाभरापूर्वीच एका कपड्याच्या दुकानात नोकरी सुरू केली होती. तर महेश पवार हा मजुरीचे काम करत होता. दोघांची गेल्या आठ वर्षांपासून घनिष्ठ मैत्री होती. मात्र, दांडिया खेळताना झालेल्या वादामुळे या मैत्रीचे रूपांतर दुर्दैवी घटनेत झाले.

रविवारी रात्री दांडिया खेळत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी नशेत असलेल्या महेशने लोखंडी रॉडने पुष्करच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संघर्षनगर परिसरात खळबळ उडाली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हत्येसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महेश पवार याला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती