सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
  • इटलीत Gen-z आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार; आईवडिलांकडून वसूल केली जाणार नुकसान भरपाई, मेलोनी यांचा मोठा निर्णय !
  • जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
  • उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
 जिल्हा

कराडच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची ट्रकला धडक; चार युवकांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

डिजिटल पुणे    21-10-2026 13:44:38

कराड (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराड शहराजवळील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या सातारा जिल्ह्यातील चार युवकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. बुधवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातातील सर्व युवक सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी होते. दसऱ्याच्या निमित्ताने ते कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे परतत असताना कराडजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेमुळे कातरखटाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

चार युवकांचा दुर्दैवी अंत; तिघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत स्कॉर्पिओचा चालक तेजस देशमुख (वय २५), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) यांचा मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर पहिलाच मोठा अपघात

कराड शहराजवळ पुणे-बंगळूर महामार्गावर बांधण्यात आलेला सहापदरी उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलावर घडलेल्या पहिल्याच मोठ्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दसऱ्याच्या सणानिमित्त देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या युवकांवर काळाने झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहनांची सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती