सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब;काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
  • दसरा कार्यक्रमात रणबीर कपूरची जीभ घसरली! ‘सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल’ म्हणताच ट्रोलिंग, अभिनेत्याने मागितली माफी
  • जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात, दुसऱ्याच दिवशी भारतात परत पाठवले
 शहर

जीविधा 'आयोजित पर्यावरण व्याख्यानमाला २६ ऑक्टोबर पासून ;'शोधयात्रा - युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास'

डिजिटल पुणे    22-10-2026 16:35:15

 पुणे : जीविधा' संस्थेतर्फे पर्यावरण व्याख्यानमाला २६ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली  आहे.  ही व्याख्यानमाला 'शोधयात्रा - युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास' या संकल्पनेवर आधारित असणार  आहे.ही व्याख्यानमाला सोमवार दि. २६ ते शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्र नगर, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे होणार आहे.जीविधा' चे संस्थापक राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

आपल्या आजूबाजूचा निसर्ग म्हणजे अद्भुत रहस्यांचा खजिना आहे. कीटकांचे गूढ विश्व, दुर्मिळ पक्ष्यांचा शोध, वन्यजीवांच्या हालचाली आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत फुलणाऱ्या वनस्पती अशा निसर्गाच्या विविध पैलूंवर युवा संशोधक आपले अनुभव मांडणार आहेत.

व्याख्यानमालेची सुरुवात सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी ईशान पहाडे यांच्या 'कीटक व आपण' या विषयाने होईल. मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी मिहीर जोशी 'विंचवाचे विश्व' या विषयावर बोलतील. बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी हृषिकेश करंदीकर 'दुर्मिळ रानपिंगळ्याच्या मागावर' हा विषय मांडतील. गुरुवार दि. २९ ऑक्टोबर रोजी अर्णव गंधे 'संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून संवर्धन' यावर संवाद साधतील आणि शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आनंदी कोरडे 'वनस्पती सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या' या विषयावर मार्गदर्शन करतील.ही व्याख्यानमाला निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती