सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
  • आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
  • 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
  • दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा,
  • उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात पारंपारिक खेळांचे आयोजन

डिजिटल पुणे    24-10-2026 16:14:16

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय भारत सरकार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या 'नशा मुक्त युवक फॉर विकसित भारत' या अभियानांतर्गत ' पारंपरिक खेळ' या संकल्पनेखाली  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते याचा उद्देश पारंपरिक खेळ व्यसन आणि रिकाम्या वेळेला निरोगी, कमी खर्चाचे व समुदायाधारित पर्याय म्हणून पुन्हा रुजवणे. हा आहे 'व्यसनाधीनता व व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम' तसेच 'पोषण आहाराचे महत्त्व' या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके होते, प्रमुख पाहुणे म्हणून नागरी संरक्षण दल कोथरूड समन्वयक योगेश परदेशी, डॉ . शुभांगी औटी, डॉ.सपना राणे, डॉ.श्रीनिवास इपलपल्ली, डॉ.शोभा तितर, डॉ.योगेश पवार होते.यावेळी विद्यार्थ्यांनी रस्सीखेच, लगोर, कबड्डी, लेझीम, आट्यापाट्या, लिंबू चमचा, तीन टांगी दौड, दंडक बैठका, पोत्यातील उड्या, भोवरा खेळणे, दोरीवरील उड्या, लिंबू चमचा असे पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विशेष सहकार्य  डॉ. योगेश पवार व प्रा. निखिल सातव यांचे लाभले. मन आणि शरीरावरही विपरीत परिणाम करणाऱ्या मोबाईलच्या चक्रव्यूहातून बाहेर येत मातीतले खेळ मुलांनी खेळावे, त्यांना आपल्या पारंपरिक खेळांची माहिती व्हावी आणि त्यांचे मन व शरीर सुदृढ राहावे, असा उद्देश नजरेसमोर ठेवत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे  प्राचार्य तथा सहाय्यक अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, डॉ.अशोक शेळके, प्रा.रचना कोळपे,प्रा.निकिता कदमबांडे, प्रा.प्रशांत एखंडे,प्रा. तिक्षा चौधरी, प्रा.कीर्ती करंजावणे, आशिष परमार, संजय कुंभार यांनी केले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषण आहार याबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. 'निरोगी युवक - व्यसनमुक्त समाज - विकसित भारत' या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.


 Give Feedback



 जाहिराती