सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
  • 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
  • कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा, हातात थाळ्या-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा : सयाजी शिंदे
  • मोठी बातमी : तीन तासांपासून लोकल जागच्या जागी उभ्या, सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बोजवारा!
  • मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
  • आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात युवक शिरला; हातातील बोर्डने लक्ष वेधले, सह्याद्रीचं जंगल वाचवण्याची आर्त हाक
 क्राईम

घाटकोपरमध्ये संतापजनक घटना! पत्नीशी वादानंतर पित्याने ९ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकले; आरोपीला अटक

डिजिटल पुणे    26-10-2026 18:03:22

मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात कौटुंबिक वादातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर एका पित्याने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घाटकोपर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपी पतीला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरती जाफर शेख (वय २२) या घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात राहतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचा जाफर शेख (वय २३) याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला आरव नावाचा नऊ महिन्यांचा मुलगा आहे. आरोपी जाफर हा परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.

आरोपीला नशेचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. रविवारीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. याच वादातून पुढे ही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप आहे.

बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न; आईने केला विरोध

रविवारी रात्री आरती या आपल्या बाळासह घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर उभ्या होत्या. त्याचवेळी त्यांचे पती जाफर तेथे आले आणि दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या दरम्यान जाफर यांनी बाळाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरती यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.यामुळे संतप्त झालेल्या जाफर यांनी कथितपणे नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

बाळाची प्रकृती गंभीर; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

घटनेची माहिती मिळताच आरती यांनी तातडीने खाली धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी बाळाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घाटकोपर पोलिसांकडून कारवाई

या घटनेनंतर आरती यांनी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जाफर शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.कौटुंबिक वादातून निष्पाप बालकाचा जीव धोक्यात आल्याने या घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती