सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
  • पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 विश्लेषण

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!

डिजिटल पुणे    27-10-2026 12:48:37

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक विभागाने नवीन नियम लागू करण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या अपर पोलीस महासंचालक, वाहतूक विभागाकडून २६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, १ नोव्हेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. बोगद्यांमधील सुरक्षितता आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन हे निर्बंध निश्चित करण्यात आले आहेत.

कार आणि बससाठी वेगमर्यादा निश्चित

मिसिंग लिंक मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने स्वतंत्र मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, हलकी खासगी वाहने आणि कार यांना ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करता येईल. तर प्रवासी बससाठी ताशी ८० किलोमीटरची कमाल वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना निर्धारित वेगमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

पिकअप व्हॅनसह सर्व मालवाहू वाहनांना बंदी

मिसिंग लिंकवरून मालवाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता प्रवेश मिळणार नाही. पिकअप व्हॅन, टाटा एस यांसारख्या हलक्या मालवाहू वाहनांसह सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या मालवाहू वाहनांवर या मार्गावर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय ज्वलनशील पदार्थ, स्फोटके आणि इतर धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गाचा वापर करता येणार नाही.

मालवाहू वाहनांसाठी जुना मार्गच पर्याय

मिसिंग लिंकवर मालवाहू वाहनांना प्रवेश नाकारण्यात आल्याने अशा वाहनचालकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या जुन्या मार्गिकेवरूनच प्रवास करावा लागणार आहे. बोगद्यांमधील संभाव्य धोके कमी करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

१ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी. तसेच निर्धारित वेगमर्यादा आणि प्रवेशासंदर्भातील नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती