सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
  • पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 शहर

अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

डिजिटल पुणे    27-10-2026 16:54:57

पुणे : पुणेकरांसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका क्रमांक ३ च्या उद्घाटनासाठी अखेर ३ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीने या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्घाटन सोहळा बालेवाडीत होणार

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान उभारण्यात आलेल्या मेट्रो मार्गिकेचा उद्घाटन सोहळा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी होऊन मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती अपेक्षित आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर उद्घाटनाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

२३.३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा मेट्रो प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. सुमारे २३.३ किलोमीटर लांबीची ही मार्गिका हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला शिवाजीनगरशी जोडणार आहे.

या मार्गावर एकूण २३ स्थानकांचा समावेश असून, उपलब्ध माहितीनुसार त्यापैकी १७ स्थानके उद्घाटनासाठी तयार आहेत. उर्वरित सहा स्थानकांवरील काम अद्याप सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नेमकी किती स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार, याबाबतची अंतिम माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा?

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी, माण, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना पर्यायी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. रस्त्यावरील खासगी वाहनांची गर्दी कमी करण्यासही या प्रकल्पाची मदत होऊ शकते.

वारंवार पुढे ढकललेल्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित पुणे दौरा पुढे गेल्याने नियोजित कार्यक्रमाबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आल्याने ३ नोव्हेंबरच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पीएमआरडीए आणि प्रकल्प कंपनीच्या प्रतिनिधींनी अलीकडेच बैठक घेऊन कामाची सद्यस्थिती, आवश्यक व्यवस्था आणि प्रवासी सेवा सुरू करण्याच्या तयारीचा आढावा घेतल्याची माहिती आहे.मेट्रोचे उद्घाटन आणि प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याची तारीख यासंबंधीची अंतिम माहिती अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता या बहुप्रतीक्षित मेट्रो सेवेच्या प्रत्यक्ष प्रारंभाची प्रतीक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती