सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
  • पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 शहर

पुण्यातील येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला परळीतून अटक

गजानन मेनकुदळे    27-10-2026 18:40:38

पुणे : गंभीर गुन्ह्यात गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून शिताफीने अटक केली आहे. नझीर मुस्तफा खान (वय ४६, व्यवसाय मजुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने वारंवार राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलून पोलिसांना चकवा दिला होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी होता फरार

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सन २००६ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२००६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३६६(अ) आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार झाला होता. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपी फरार असल्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता.

पुणे शहरातील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले होते. या आदेशानुसार येरवडा पोलिसांकडून आरोपीचा सातत्याने शोध घेतला जात होता.

वारंवार पत्ते आणि मोबाईल क्रमांक बदलून पोलिसांना दिला चकवा

तपासादरम्यान आरोपी अंबड, जिल्हा जालना येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले. यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार संदीप जायभाय आणि सोमनाथ गायकवाड यांनी संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला होता; मात्र तो मिळून आला नव्हता.

त्यानंतर तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जायभाय आणि साईनाथ मस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी सध्या परळी येथे वास्तव्यास असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

आरोपी पुण्यातील सय्यदनगर, हडपसर आणि लोहगाव, तसेच जालना जिल्ह्यातील अंबड, बीड जिल्ह्यातील परळी व माजलगाव आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या भागांमध्ये वारंवार ठिकाणे बदलून राहत होता. तो मोबाईल क्रमांकही वारंवार बदलत होता. तसेच, आपल्या भावासह इतर नातेवाईकांशी कोणताही संपर्क ठेवत नव्हता. मिळेल त्या ठिकाणी दोन ते तीन दिवस गवंडीकाम करून त्यानंतर कामाचे आणि राहण्याचे ठिकाण बदलत असल्याची माहिती तपासात समोर आली.

परळी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून अटक

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार संदीप जायभाय आणि साईनाथ मस्के यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास सुरू केला. परळी पोलीस स्टेशनमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपीवर पाळत ठेवण्यात आली होती. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव नझीर मुस्तफा खान, वय ४६, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार राजगल्ली, आयेशा कॉलनी, उर्दू शाळेजवळ, परळी, जिल्हा बीड असे सांगितले. त्यानंतर त्याला परळी पोलीस स्टेशन येथे नेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुढील तपासासाठी आरोपीला येरवडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत आणि येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी पार पाडली.

या तपास पथकात तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस हवालदार विनोद कायगुडे (बक्कल क्रमांक ६६६३), पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार संदीप जायभाय, साईनाथ मस्के, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार आणि संदीप धादवड यांचा समावेश होता.

येरवडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तब्बल दोन दशकांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आले असून, पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती