सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 जिल्हा

रायगड जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर कारवाई; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    28-10-2026 11:29:00

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गिरवले येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैधरीत्या गॅस सिलेंडर साठवणुकीवर कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण १३६ गॅस सिलेंडर, एक टेम्पो आणि एक मोटार असा अंदाजे १० लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय दक्षता पथकाने गिरवले येथे छापा टाकला यावेळी भरलेले व रिकामे असे एकूण १३६ सिलेंडर अवैधरीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये १९ किलोचे १४ आणि १५ किलोचे ४ भरलेले सिलेंडर, तसेच १९ किलोचे ४, १५ किलोचे ११२ आणि ५ किलोचे २ रिकामे सिलेंडर यांचा समावेश आहे. या सिलेंडरसोबत एक टेम्पो आणि एक मोटारही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, पनवेल निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे, शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, अरुण काते, राजेश सोरते, देवानंद थोरवे, रवींद्र राठोड आणि पवन कुंभले यांनी केली.


 Give Feedback



 जाहिराती