सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची भीषण धडक; ४६ जणांचा मृत्यू, १७९ प्रवासी जखमी
  • अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
  • केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ, मोदी सरकारकडून 10,016 कोटी मंजूर
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 क्राईम

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा छापा; सहा बांगलादेशी महिला आढळल्या, एजंट ताब्यात

गजानन मेनकुदळे    28-10-2026 17:42:38

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा बांगलादेशी महिला आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान संबंधित महिलांशी निगडित एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री करण्यात आली.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक मखारे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुडाळे, तसेच फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक गाडीलवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या संयुक्त कारवाईत सहभाग घेतला.

छाप्यादरम्यान एकूण सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या. तसेच त्यांच्याशी संबंधित एका एजंटला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या एजंटसह आणखी दोन फरार आरोपींविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती