सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
  • राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
  • शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
 DIGITAL PUNE NEWS

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का! रोहित पवारांचा फडणवीसांना टोला; डिलिट केलेल्या ट्विटवरूनही केली टीका

डिजिटल पुणे    29-10-2026 12:34:04

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभवाची धूळ चारली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालत बंडखोरांची समजूत काढण्यापासून ते प्रचाराच्या नियोजनापर्यंत पुढाकार घेतला होता. मात्र, एवढे प्रयत्न करूनही भाजपला विजय मिळवता आला नाही. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी फडणवीस यांच्या डिलिट केलेल्या ट्विटचाही उल्लेख करत सत्तेच्या अहंकारावरून टोला लगावला आहे.

रोहित पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. या मतदारसंघाकडे फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष दिले होते. तसेच बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी स्वतः भेटी घेतल्याचा उल्लेख रोहित पवार यांनी केला.

संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपला पराभव स्वीकारावा लागणे, ही पक्षासाठी महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केले. एवढे प्रयत्न करूनही विजय मिळाला नाही, यावरून त्यांनी भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फडणवीस यांच्या डिलिट केलेल्या ट्विटचा संदर्भ देत रोहित पवार यांनी सत्तेचा अहंकार योग्य नसल्याची टीका केली. निवडणूक मतपत्रिकेवर झाली होती, याचा विसर पडला असावा, असा उपरोधिक टोमणाही त्यांनी लगावला. यासोबतच विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले आणि निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांनाही शुभेच्छा दिल्या.

भाजपने लावली होती संपूर्ण ताकद

नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. पक्षसंघटनेतील नेत्यांनी एकत्रितपणे काम केल्याचे सांगण्यात आले होते. भाजपमधील बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल सोले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मनधरणी केल्याचेही समोर आले होते.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जोर लावूनही भाजपला विजय मिळवता न आल्याने राजकीय वर्तुळात या निकालाची चर्चा सुरू झाली आहे.

नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजीत वंजारींचा विजय

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. या निवडणुकीत वंजारी यांनी 3 हजार 271 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

मतांचा तपशील पुढीलप्रमाणे :

- अभिजीत वंजारी (काँग्रेस) : 67,231 मते

- सुधाकर कोहळे (भाजप) : 63,960 मते

- नितेश कराळे (अपक्ष) : 25,909 मते

अभिजीत वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. त्यामुळे वंजारी यांनी 3 हजार 271 मतांच्या मताधिक्याने बाजी मारली.

फडणवीसांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

नागपूर हा देवेंद्र फडणवीस यांचा गृहमतदारसंघ असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही याच शहरात आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा झालेला पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. निकालानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात असून, रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.आता या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात आणि भाजप या निकालाचे विश्लेषण कसे करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती