सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल
  • युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
  • मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात चौकशीनंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका
  • तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
  • राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
  • शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
 जिल्हा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

डिजिटल पुणे    29-10-2026 18:13:28

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी आदी निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बैठकीस एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते. राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार अनुक्रमे ₹१,५०० ते ₹२,००० आणि ₹५०० ते ₹१,००० प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आला आहे.

यावेळी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मंत्री तटकरे यांनी  सूचना दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती