पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत भरतनाट्यम नर्तक श्रेयस नायर(मुंबई) यांचे एकल भरतनाट्यम सादरीकरण शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.मुंबईचे युवा आणि प्रतिभावान नर्तक श्रेयस नायर हे भरतनाट्यमच्या पारंपरिक शैलीसोबतच समकालीन भाव-प्रस्तुतीसाठी ओळखले जातात.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ३१० वा कार्यक्रम असून सर्वांसाठी प्रवेश खुला आहे.,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.