सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
  • महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
  • ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
  • बद्रीनाथहून परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जोशीमठजवळ कोसळले, पायलटसह सहा जणांचा मृत्यू
  • मिनाक्षी शिंदेंना दुहेरी धक्का, आधी राजीनामा द्यावा लागला, नंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी साथही सोडली, टेंभी नाक्यावर कोणीच फिरकलं नाही
  • पुण्यातील सारसबागेसमोर खळबळजनक घटना; 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
 शहर

राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

डिजिटल पुणे    30-10-2026 18:24:18

पुणे : इंदापूर तालुक्यातील मौजे राजवडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने बाहेर काढून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

आज, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना अचानक माती-मुरुमाचा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी तीन मजूर काम करीत होते. त्यापैकी एका मजुराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. उर्वरित दोन मजुरांपैकी एकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर एका मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव व मदतकार्य हाती घेऊन जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून घटनेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती