सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा

डिजिटल पुणे    31-10-2026 12:40:58

पुणे  : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले गेले व राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.भाऊसाहेब भोसले, प्राचार्य डॉ. पंडित शेळके,डॉ. शुभांगी औटी,डॉ. शोभा तितर,डॉ. योगेश पवार, डॉ.सपना राणे,डॉ. श्रीनिवास ईपलपल्ली, डॉ.आदिनाथ पाठक, प्रा.नरेंद्र केदारी, प्रा.अरुण शिंदे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.भाऊसाहेब भोसले म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल हे देशाच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शिल्पकार होते,भारत हा केवळ भौगोलिक क्षेत्र नव्हे तर समृद्ध आणि गौरवशाली परंपरा आणि संस्कृती जपणारा देश आहे. सरदार पटेलांच्या कार्यामुळे ते केवळ इतिहासात नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनामनात वसती करुन आहेत देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा पुनर्निर्धार करण्याची आवश्यकता आहे अशा शब्दात अभिवादन केले.

 उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे  प्राचार्य तथा सहाय्यक अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, डॉ.अशोक शेळके, प्रा.रचना कोळपे, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ.रुपाली शेंडकर,प्रा.निकिता कदमबांडे, प्रा. तिक्षा चौधरी, प्रा.कीर्ती करंजावणे, श्री आशिष परमार, संजय कुंभार यांनी केले.

 


 Give Feedback



 जाहिराती