सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 जिल्हा

नालासोपाऱ्यात पाचव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, नव्या इमारतीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

डिजिटल पुणे    31-10-2026 15:54:24

विरार : वसई-विरार परिसरातील नालासोपारा पश्चिम येथे लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धनंजय एव्हेन्यू या इमारतीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळली. या भीषण दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून, त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लिफ्ट कोसळल्यामुळे त्यामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या पायांना दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, संबंधित लिफ्ट ओमेक्स कंपनीची असून, अवघ्या दोन वर्षांपूर्वी ती सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आली होती. नवीन इमारत असूनही लिफ्टमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत बिल्डरकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.

आमदार राजन नाईक यांनी दिली घटनास्थळाची माहिती

या दुर्घटनेनंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणपार येथील इमारतीत लिफ्ट कोसळण्याची घटना घडली असून, सात जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या एक्स-रे तपासण्या सुरू असून, प्रकृतीबाबतची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे नव्या इमारतींमधील लिफ्टची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नियमित देखभाल याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लिफ्टमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला आणि ही दुर्घटना कशामुळे घडली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती