सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 क्राईम

पुण्यात धक्कादायक घटना! १८ व्या मजल्यावरून आईने सहा वर्षांच्या मुलासह घेतली उडी; सुसाईड नोटमधून समोर आलं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण

डिजिटल पुणे    31-10-2026 16:13:14

पिंपरी-चिंचवड : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये एका ३३ वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृत मायलेकांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी आणि पंचनामा केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना महिलेने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे. या चिठ्ठीतील मजकुरामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या आजारपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. तसेच, आपल्या मृत्यूनंतर मुलाला आईची सतत आठवण येत राहील आणि तो तिच्या अनुपस्थितीशी कसा जुळवून घेईल, अशी चिंता तिने व्यक्त केली होती. याच विचारातून मुलालाही सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत लिहिल्याचे समोर आले आहे.

याशिवाय, आपल्या मृत्यूनंतर पतीने दुसरे लग्न करून नव्याने आयुष्य सुरू करावे, अशी इच्छाही तिने व्यक्त केली होती. मुलाच्या संगोपनामुळे पतीला दुसरे लग्न करताना अडचणी येऊ शकतात, अशी भीतीही तिने चिठ्ठीत व्यक्त केल्याचे समजते. सध्या पोलीस या चिठ्ठीतील मजकुराची पडताळणी करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये महत्त्वाची माहिती

पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एकता या मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसून आल्या. त्यानंतर १८ व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्या चपला आढळल्याची माहिती समोर आली आहे. या प्राथमिक तपासातून दोघांनीही उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दोन वर्षांपासून सोसायटीत वास्तव्यास

एकता भांगड या गृहिणी होत्या, तर त्यांचे पती येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून, गेल्या दोन वर्षांपासून सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये वास्तव्यास होते.

या घटनेबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी माहिती दिली असून, आजारपणाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती