सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 शहर

स्वरगंध' गीतांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी ;भारतीय विद्या भवन ,इन्फोसिस फाउंडेशन कडून दिवाळी स्वरपहाट कार्यक्रम

डिजिटल पुणे    02-11-2026 10:36:07

पुणे - भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गोल्डन मेमरीज प्रस्तुत 'स्वरगंध' हा सुमधुर हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवार, दि. ४  नोव्हेंबर २०२६  रोजी सकाळी साडेसहा  वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची असून गायन शशांक दिवेकर आणि चैत्राली अभ्यंकर यांचे असणार आहे. वाद्यवृंदामध्ये कीबोर्डवर सुभाष देशपांडे आणि तुषार दीक्षित, तबल्यावर केदार तळणीकर आणि ऑक्टोपॅडवर रोहित जाधव साथसंगत करणार आहेत.कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत कुलकर्णी करणार आहेत.

 भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ३११  वा कार्यक्रम दिवाळी स्वर पहाट म्हणून सादर करण्यात येत आहे,सर्व रसिकांसाठी प्रवेश खुला आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. 

 


 Give Feedback



 जाहिराती