सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 शहर

'दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करा' ;दुष्काळ निवारण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

डिजिटल पुणे    02-11-2026 17:02:26

पुणे : दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समिती, महाराष्ट्रच्या वतीने दुष्काळाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात राज्यातील विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी समितीची भूमिका आहे.

दुष्काळ हा केवळ नैसर्गिक आपत्ती नसून नियोजनाच्या अभावाचा परिणाम असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. जलसंधारणाची कामे, धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.या मागण्यांसाठी सरकारने विशेष कृती आराखडा तयार करून प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळ नियंत्रण कक्ष सक्रिय करावा, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी साथी सुभाष वारे, इब्राहिम खान, युवराज गटकळ, संदेश दिवेकर, उपेंद्र टण्णू, दत्तात्रय जाधव, मेधा थत्ते व राहुल भोसले उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती