सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 जिल्हा

बांधिलकी:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

डिजिटल पुणे    02-11-2026 17:08:27

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आज हा मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता, त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या प्रसंगी श्री. बागडे यांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला.या प्रसंगी इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आ.सुहास शिरसाट, आ.अनुराधाताई चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खा.डॉ.भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती