सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 शहर

शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द

डिजिटल पुणे    02-11-2026 17:45:47

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सततच्या दौऱ्यामुळे त्यांना थकवा जाणवत असून, नियमित तपासणीसह काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव मराठवाड्यातील नियोजित दुष्काळ पाहणी दौराही रद्द करण्यात आला आहे.

दोन दिवस रुग्णालयात विश्रांती घेणार

शरद पवार यांना पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, त्यांचे अहवाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत माहिती दिली आहे. बाबांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले असून, काही वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती देत राहीन, असे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसांमध्ये वेदना, नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल

रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित आरोग्य तपासणी आणि फुफ्फुसांमध्ये जाणवणाऱ्या वेदनांमुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कफ आणि अशक्तपणाचाही त्रास जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

सोलापुरात शेतकऱ्यांशी संवाद; दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

शरद पवार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर होते. ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव तसेच पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच त्यांच्या समस्या सरकारदरबारी मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

प्रकृतीमुळे दौऱ्यात बदल

शरद पवार यांचा सोलापूरनंतर धाराशिव, बीड आणि मराठवाड्यातील अन्य दुष्काळग्रस्त भागांचा दौरा नियोजित होता. मात्र, अचानक प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्याने त्यांना हा दौरा अर्धवट सोडून पुण्याकडे परतावे लागले.

सुरुवातीला प्रतिकूल हवामानामुळे दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव दौऱ्यात बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सध्या शरद पवार यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये वैद्यकीय तपासण्या सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती