सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 क्राईम

पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांकडून ‘झांबरे पॅलेस’ कार्यालयाची तोडफोड

डिजिटल पुणे    02-11-2026 18:44:00

पुणे : पुण्यातील मुकुंद नगर परिसरात एका २९ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पायल पवार झांबरे असे मृत महिलेचे नाव असून, त्या पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेसच्या मालक कुटुंबातील सून असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत महर्षी नगर येथील झांबरे पॅलेस कार्यालयात तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पायल पवार झांबरे यांनी मुकुंद नगर येथील आपल्या राहत्या घरी जीवन संपवले. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिकृत तपासातूनच घटनेमागील सत्य समोर येणार आहे.

संतप्त नातेवाईकांचा झांबरे पॅलेसवर हल्ला

पायल यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांसह काही जण महर्षी नगर येथील झांबरे पॅलेस कार्यालयात पोहोचले. सोमवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास १५ ते २० जणांच्या जमावाने कार्यालयात तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यालयातील साहित्याचे नुकसान झाले.

परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संभाव्य तणाव लक्षात घेता झांबरे पॅलेस आणि मुकुंद नगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.दरम्यान, एका विवाहित महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येमागील कारण आणि तोडफोडीच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात तपासानंतर नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती