सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 शहर

पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ; कार घेऊन थेट बंगल्यात प्रवेश, शिवीगाळ केल्याचा आरोप

गजानन मेनकुदळे    04-11-2026 10:07:18

पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. बदलीच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या या कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत कार घेऊन थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी त्याने तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जवळपास अर्धा तास गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.

अमोल भिसे असे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी काही कारणांमुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. मात्र, अपेक्षित बदली न मिळाल्याने तो नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

याच नाराजीतून त्याने दारूच्या नशेत पोलीस आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी धाव घेतली. कार घेऊन बंगल्याच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे काही काळ निवासस्थान परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे तसेच गोंधळ घातल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच थेट पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी अशा प्रकारे गोंधळ घातल्याने या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती