सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 जिल्हा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४ हजार ७६४ कोटी रुपये जमा

डिजिटल पुणे    05-11-2026 11:11:04

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आज ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४ हजार ७६४ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १८ हजार ४० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रकमेचे ऑनलाइन वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. यासाठी राज्य शासनाने महाआयटीची नियुक्ती केली असून, बँकांकडून आतापर्यंत ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, तर चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर यापूर्वी १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यात आजच्या ४.८७ लाख शेतकऱ्यांना वितरित केलेल्या लाभाची भर पडली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २०.७२ लाखांवर, तर वितरित कर्जमाफीची रक्कम १८ हजार ४० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.


 Give Feedback



 जाहिराती