सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप
  • 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
 जिल्हा

कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; आईचा दुर्दैवी मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

डिजिटल पुणे    05-11-2026 12:47:56

कराड (सातारा) : कराडजवळील मलकापूर शहरात उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. मलकापुरातील ढेबेवाडी फाट्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेत उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उसाने खचाखच भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अचानक रस्त्यावर पलटी झाली. यावेळी जवळून जाणाऱ्या दोन दुचाकी ट्रॉली आणि उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. तसेच दोन ते तीन जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी पाटण तालुक्यातील एका दुचाकीस्वाराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

दरम्यान, बचावकार्य सुरू असताना काढणे (ता. पाटण) येथील मालन मोहन सुतार (वय ६०) आणि त्यांचा मुलगा यशवंत मोहन सुतार (वय २८) हे उसाच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे समोर आले. मात्र, उसाचा मोठा ढिगारा अंगावर कोसळल्याने मालन सुतार यांचा जागीच मृत्यू झाला. तर यशवंत सुतार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आईचा मृत्यू आणि मुलगा जखमी झाल्याच्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ट्रॉलीखाली किंवा उसाच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध कराड वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून सुरू असून, अपघाताचा पुढील तपास केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती