सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप
  • 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
 जिल्हा

मुंबईतील अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! १०,२०० महिलांना भाऊबीज भेट; थेट खात्यात रक्कम जमा

डिजिटल पुणे    05-11-2026 13:39:54

मुंबई :  अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाची भाऊबीज भेट दिवाळीपूर्वीच थेट बँक खात्यात अदा करण्यात आली आहे. मुंबईतील सुमारे १० हजार २०० अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यंदाची दिवाळी आनंददायी होणार आहे, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब तोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असतात. गरोदर माता, स्तनदा माता, नवजात बालके तसेच सहा वर्षांखालील बालकांचे पोषण व आरोग्य संवर्धन, बालकांचे वजन व उंची मोजणे, कुपोषणाचे सर्वेक्षण, माता-बालकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात. याशिवाय शासनाच्या पोषण अभियानांतर्गत पोषण ट्रॅकर प्रणालीवर लाभार्थ्यांची नोंदणी, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, पोषण आहार वितरणाची नोंद, विविध अहवाल सादर करणे तसेच आरोग्य व पोषणविषयक जनजागृती करण्याचे कामही अंगणवाडी सेविकांमार्फत केले जाते. या सर्व कामांमध्ये मदतनीस यांचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे असते.

यापूर्वी भाऊबीज भेटीचे वाटप जिल्हास्तरावरून करण्यात येत असे. मात्र, यंदा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत रक्कम थेट पोहोचण्यास मदत झाली असून वितरण प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता निर्माण झाली आहे.

या योगदानाची दखल घेऊन दिवाळीच्या सणानिमित्त देण्यात आलेली भाऊबीज भेट ही त्यांच्या कामाचा सन्मान करणारी आहे. आयुक्तालयामार्फत ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याने त्यांना दिवाळीपूर्वीच या भेटीचा लाभ मिळाला आहे. या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उत्साह वाढण्यास निश्चितच मदत होईल.


 Give Feedback



 जाहिराती