सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
  • मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
  • मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
 क्राईम

मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, दोन आरोपींना अटक

डिजिटल पुणे    12-11-2026 19:31:12

मुंबई : मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गोरेगाव परिसरात मेकअप आर्टिस्टच्या घरातून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवलेले कोकेन पोलिसांनी छापेमारीदरम्यान हस्तगत केले. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल २१ कोटी १३ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

बांगूरनगर पोलिसांनी गोरेगाव येथील लिंक रोडवरील शिवम सोसायटीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या फुलचंद ईश्वरदयाल कश्यप (वय ३१) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता सहा ग्रॅम कोकेन आणि मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता मालाडमधील मढ व्हिलेज येथे असलेल्या त्याच्या घरातही अमली पदार्थांचा साठा असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवलेले तब्बल ६७२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६७८ ग्रॅम कोकेन पोलिसांच्या हाती लागले. या कोकेनची बाजारातील किंमत सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. मोबाईल आणि इतर साहित्यांसह एकूण ३ कोटी ३८ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

झटपट पैसे कमावण्यासाठी ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय

प्राथमिक तपासात फुलचंद कश्यप हा व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट असून, झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने कोकेन विक्रीच्या व्यवसायात उतरल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आला असताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी बोरिवली न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात साथीदाराचे नाव उघड; मुजाहिद अलीलाही अटक

पोलिसांच्या पुढील तपासादरम्यान या अमली पदार्थांच्या व्यवहारात मुजाहिद अली याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसह एकूण २१ कोटी १३ लाख रुपयांचा साठा जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोकेनचा पुरवठा नेमका कोण करत होते, हा साठा कोणाला विकला जाणार होता आणि या ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती