पुणे : भारती विद्यापीठाचे कार्यवाह तथा प्र-कुलगुरू मा. डॉ. विश्वजीत कदम यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे येथे त्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मा. सौ. स्वप्नाली विश्वजित कदम, अध्यक्षा, भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स, पुणे, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह मा. डॉ. के. डी. जाधव, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू मा. डॉ. विवेक सावजी, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुहास मोहिते, प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते, वित्त अधिकारी सौ. ऐश्वर्या हार्दीकर, वित्त व लेखापरीक्षण विभागाचे संयुक्त संचालक श्री. संतोष सॅलियन, मुख्य अभियंता श्री. डी. एस. भोसले, विद्युत अभियंता श्री. औदुंबर सूर्यवंशी तसेच विद्यापीठ व महाविद्यालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मा. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, "सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी आहे. या बँकेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे प्राथमिक ध्येय असेल."
यावेळी मा. डॉ. के. डी. जाधव यांनी डॉ. विश्वजीत कदम यांची निवड ही सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याणाच्या उपक्रमांना निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मा. डॉ. विवेक सावजी यांनीही डॉ. विश्वजीत कदम यांचे अभिनंदन केले. त्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन, प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वगुण यांमुळे सांगली जिल्ह्यातील सहकार चळवळीला निश्चितच बळकटी मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. विश्वजीत कदम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भारती विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
