सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 DIGITAL PUNE NEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधांचे लोकार्पण

डिजिटल पुणे    16-11-2026 12:09:22

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा आणि बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नूतन बॅडमिंटन हॉलमध्ये स्वतः रॅकेट हाती घेऊन बॅडमिंटन खेळत हॉलचे उद्घाटन केले.

जिल्हा क्रीडा संकुलातील नवनिर्मित बॅडमिंटन हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष कोर्टवर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्या या कृतीमुळे उद्घाटन सोहळ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. क्रीडा सुविधांच्या लोकार्पणासोबतच मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष खेळातील सहभाग हा कार्यक्रमातील लक्षवेधी क्षण ठरला.क्रीडा विकासाला नवी चालना

जिल्हा क्रीडा संकुलातील नव्या सुविधांमुळे गडचिरोलीतील खेळाडूंना सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा कौशल्यविकासासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय इमारतीमुळे क्रीडाविषयक प्रशासकीय कामकाजाला सुविधा मिळणार असून व्यायामशाळेमुळे खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी मदत होणार आहे. तसेच नूतन बॅडमिंटन हॉलमुळे या खेळाच्या सरावासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा आधुनिक क्रीडा सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या सुविधांचा लाभ होणार असून गडचिरोलीच्या क्रीडा विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होईल.

मान्यवरांची उपस्थिती

या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, क्रीडा उपसंचालक महादेव कासगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल गोटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती