पुणे : भारतीय विद्या भवन,पुणे आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'ओजस,पुणे ' प्रस्तुत 'द्विधा ' हा नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम रविवार,दि.२२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता,भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे .यामध्ये कथक नृत्यांगना ईशा नानल आणि भरतनाट्यम नृत्यांगन राधिका मुळे या नृत्य सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन वर्धन चौधरी करणार आहेत.महाभारतातील पात्रांच्या द्वंद्वावर आधारित हा नृत्याविष्कार असणार आहे. महाभारतातील वेगळे पात्र ज्यांचा अभ्यास आणि सादरीकरण एरवी पहायला मिळत नाही,ते या कार्यक्रमातून सादर केले जाईल.
भारतीय विद्या भवन, पुणे आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३१३ वा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली .