सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 राज्य

बारा वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास मनाई; महाराष्ट्रात नवी नियमावली लागू, जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

डिजिटल पुणे    17-11-2026 13:39:50

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लिफ्ट वापराबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बारा वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय लिफ्ट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता मुलांना लिफ्ट किंवा एस्केलेटरचा एकट्याने वापर करता येणार नाही .लिफ्ट आणि एस्केलेटरमधील अपघातांना आळा घालून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात 1 नोव्हेंबर 2026 पासून ‘महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक, 2026’ ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांनुसार, बारा वर्षांखालील मुलांना पालक किंवा जबाबदार प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्ट अथवा एस्केलेटर वापरता येणार नाही. तसेच सोसायट्या, मॉल्स, कार्यालये आणि व्यावसायिक इमारतींमधील लिफ्ट सुरक्षेबाबतही कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

नव्या नियमावलीनुसार, प्रत्येक लिफ्टची नियमित देखभाल आणि तपासणी करणे बंधनकारक असेल. लिफ्टची दर महिन्याला तपासणी करावी लागणार असून, वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करणे आवश्यक आहे. या तपासणीचे अहवाल आणि नोंदी संबंधित व्यवस्थापनाला जतन कराव्या लागतील. तसेच लिफ्टच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

लिफ्टच्या संचालनाबाबतही महत्त्वाचे निर्बंध घालण्यात आले आहेत. अठरा  वर्षांखालील व्यक्तीला लिफ्ट ऑपरेटर म्हणून नियुक्त करता येणार नाही. नवीन लिफ्ट बसवण्यापूर्वी विद्युत निरीक्षकांची परवानगी घेणे आवश्यक असेल. याशिवाय लिफ्टची देखभाल करण्यासाठी मान्यताप्राप्त कंत्राटदाराची नियुक्ती करावी लागणार आहे.

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा ती असुरक्षित असल्याचे आढळल्यास आवश्यक दुरुस्ती आणि बदल करणे बंधनकारक असेल. लिफ्ट बंद पडल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठीही निर्धारित सुरक्षा प्रक्रियेचे पालन करावे लागेल. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला 24 तासांच्या आत देणे आवश्यक करण्यात आले आहे.

दरम्यान, लिफ्ट दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई मिळण्याची तरतूदही नव्या नियमावलीत करण्यात आली आहे. सोसायट्या आणि इमारत व्यवस्थापनाला आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 28 ऑक्टोबर 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे लिफ्टच्या देखभालीपासून ते प्रवाशांच्या सुरक्षिततेपर्यंतची जबाबदारी आता अधिक स्पष्टपणे निश्चित होणार आहे.

काय आहेत नव्या नियमावलीतील महत्त्वाचे बदल?

1.  बारा वर्षांखालील मुलांना बंदी: पालक किंवा जबाबदार प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्ट आणि एस्केलेटर वापरता येणार नाही.

2. सीसीटीव्ही अनिवार्य: लिफ्टमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची तरतूद.

3. दर महिन्याला तपासणी: प्रत्येक लिफ्टची नियमित मासिक तपासणी आवश्यक.

4. वार्षिक सुरक्षा ऑडिट: वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट बंधनकारक.

5. ऑपरेटरसाठी वयोमर्यादा: अठरा वर्षांखालील व्यक्तीला लिफ्ट ऑपरेटर म्हणून नेमता येणार नाही.

6. अपघाताची माहिती: लिफ्ट दुर्घटनेची माहिती 24 तासांत संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक.

7. नवीन लिफ्टसाठी परवानगी: लिफ्ट बसवण्यापूर्वी विद्युत निरीक्षकांची मंजुरी आवश्यक.

8. मान्यताप्राप्त कंत्राटदार: देखभाल आणि दुरुस्तीसाठी अधिकृत कंत्राटदाराची नियुक्ती आवश्यक.

9. बंद लिफ्ट पुन्हा सुरू करण्याचे नियम: आवश्यक सुरक्षा तपासणीनंतरच लिफ्ट सुरू करता येणार.

10. नुकसानभरपाईची तरतूद: लिफ्ट दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई मिळण्याची व्यवस्था.

या नव्या नियमांमुळे राज्यातील निवासी सोसायट्या, मॉल्स आणि व्यावसायिक इमारतींमधील लिफ्ट सुरक्षेला अधिक महत्त्व मिळणार असून, लहान मुलांसह सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थापन आणि नागरिकांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती