पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे 'जनरेटिव्ह एआय आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण' या विषयावर एक आठवड्याच्या ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन झाले. संगणक अभियांत्रिकी विभागाने इन्फिनिट ग्राफिक्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि बर्डव्हिजन कन्सल्टिंग प्रा. लि. यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि.१६ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होत असून यामध्ये शिक्षण,संशोधन आणि व्यावसायिक कामात जनरेटिव्ह एआय आणि प्रभावी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या शक्यता यावर चर्चा होणार आहे.
उद्घाटन समारंभाला भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.संदीप वांजळे,इन्फिनिट ग्राफिक्स टेक्नॉलॉजीजचे सहाय्यक व्यवस्थापक प्रेम नाईक,बर्डव्हिजन कन्सल्टिंगचे सहसंस्थापक महावीर मुथा,तसेच एफडीपी समन्वयक डॉ.वीणा जाधव आणि डॉ.मयुरी मोळावडे,महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सहभागी उपस्थित होते.जनरेटिव्ह एआय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि त्यांचा शिक्षण तसेच आंतरशाखीय क्षेत्रातील वापर याबाबत सहभागींना माहिती देणे हा या एफडीपीचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रभरातून १०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत.उदघाटन कार्यक्रमाचे स्वागत प्रा.मयुरी सुतार यांनी केले, तर कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती डॉ. वीणा जाधव यांनी दिली.समारोप डॉ. मयुरी मोळावडे यांनी आभार प्रदर्शनाने केला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.राजेश प्रसाद यांनी शिक्षकांना एआयसाठी सज्ज करण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, व्यावसायिक क्षमता सातत्याने वाढवणे आणि शैक्षणिक कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.डॉ.संदीप वंजाळे यांनी विभागाची ओळख करून दिली आणि प्राध्यापकांना नव्या तंत्रज्ञानाची कौशल्ये देणे तसेच उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील संवाद वाढवणे याचे महत्त्व सांगितले.
बर्डव्हिजन कन्सल्टिंगचे सहसंस्थापक महावीर मुथा यांनी सहभागींना केवळ तयार एआय एपीआय वापरण्यापलीकडे जाऊन स्वतःची एआय आधारित सोल्यूशन्स विकसित करण्यास प्रोत्साहित केले. तंत्रज्ञानामागील मूळ संकल्पना समजून घेऊन प्रत्यक्षातील प्रश्न सोडवणारे नाविन्यपूर्ण अॅप्लिकेशन विकसित करण्याची गरज त्यांनी मांडली. इन्फिनिट ग्राफिक्स टेक्नॉलॉजीजचे सहाय्यक व्यवस्थापक प्रेम नाईक यांनी विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधींवर चर्चा केली.यांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये एआयच्या वापराची शक्यता त्यांनी मांडली आणि एआय केवळ आयटी क्षेत्रापुरते मर्यादित नाही,असे सांगितले.उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक शिक्षण यामधील दरी प्रत्यक्ष अनुभव आणि सहकार्यातून भरून काढण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले.