सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 शहर

ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले अन् खाली मृतावस्थेत आढळले; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू

डिजिटल पुणे    19-11-2026 12:10:05

पुणे : भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा पुण्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निवासस्थानाच्या इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक जोशी हे पुण्यातील साळुंखे विहार परिसरातील एका निवासी इमारतीत राहत होते. ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास होते. बुधवारी (ता. १८) सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी घरकाम करणाऱ्या व्यक्तीला थंडी जाणवत असल्याने ऊन घेण्यासाठी गच्चीवर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच इमारतीच्या आवारात ते पडलेल्या अवस्थेत रहिवाशांना आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच घरकाम करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलीला कळवले. मुलीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अशोक जोशी यांना रुग्णवाहिकेतून सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

आधीपासूनच चक्कर येण्याचा त्रास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जोशी यांना यापूर्वी चक्कर येण्याचा त्रास होत होता. तसेच घरात असतानाही ते काही वेळा पडल्याची माहिती त्यांच्या मुलीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे गच्चीवरून पडण्यामागे चक्कर येणे किंवा अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.दरम्यान, गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीबाबत कुटुंबीयांनी कोणतीही शंका व्यक्त केलेली नाही. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेतला असून, नियमानुसार पुढील तपास सुरू आहे.

दोन युद्धांमध्ये बजावली होती महत्त्वाची भूमिका

निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांनी भारतीय लष्करात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये ते सहभागी झाले होते. तसेच त्यांनी 'डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग' या महत्त्वाच्या पदावरही काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती