सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 क्राईम

लग्नाच्या मंडपात क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या; धारदार शस्त्राने सपासप वार करत प्रेम धनगरला संपवलं, जळगावमध्ये खळबळ

डिजिटल पुणे    19-11-2026 13:26:13

जळगाव : लग्नसमारंभात झालेल्या वादाचं रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली आहे. लग्नाच्या आनंदी वातावरणात अचानक रक्ताचा थरार पाहायला मिळाला. प्रेम गोपाल धनगर (वय २३) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने बोरनार गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा बोरनार येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. कामानिमित्त तो गेल्या काही महिन्यांपासून अमळनेर येथे वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. बुधवारी गावात लग्नसमारंभ असल्याने सायंकाळी तो लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मंडपात गेला होता.

दरम्यान, लग्नाच्या ठिकाणी काही जणांसोबत प्रेमचा वाद झाला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले. यानंतर काही जणांनी प्रेमला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी एका तरुणाने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. प्रेमला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लग्नसमारंभात घडलेल्या या भीषण घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमच्या हत्येमागील नेमकं कारण काय आणि वादाला सुरुवात कशामुळे झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

 


 Give Feedback



 जाहिराती