सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 जिल्हा

चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे

डिजिटल पुणे    20-11-2026 11:20:02

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण पूर्ण होत आले असून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि सौंदर्य व कलात्मकता वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले, कार्यकारी अभियंता विराज जाधव आणि सहायक अभियंता, परिरक्षण ए विभाग रवी म्हस्के, दुय्यम अभियंता गणेश ठाकूर उपस्थित होते.

पुतळा परिसराचे दुरुस्तीकार्य, सुशोभीकरण तातडीने पूर्ण व्हावे तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती, इंदूर येथील वास्तूशिल्प, भित्तीशिल्पाद्वारे ऐतिहासिक संदर्भ आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात यावे, अशी संकल्पना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महापालिका अधिकारी यांच्या बैठकीत स्पष्ट केली होती. त्यानुसार सुरु झालेले हे काम आता पूर्णत्वास आले आहे. सौंदर्य आणि कलात्मकतेच्या दृष्टीने पाहणीवेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लवकरच या सुशोभित स्थळाचे उद्घाटन  करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

 


 Give Feedback



 जाहिराती