सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 जिल्हा

मुंबईत वाहतूक कोंडी कमी होणार ; एमएमआरडीएच्या दोन पायाभूत प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

डिजिटल पुणे    20-11-2026 17:13:43

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास वेगवान आणि अखंड करण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून ते वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली तसेच मुंबई ते वाढवण जोडणी प्रस्थापित करण्यासाठी भाईंदर/उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली (पाताल लोक) तसेच मुंबई-वाढवण द्रुतमार्ग जोडणीसंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदि उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या वतीने सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटरचा असून या प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी व विमानतळाला थेट जोडणी मिळणार आहे.

मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीच्या भाईंदर/उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. यासंदर्भात या मार्गाच्या आरेखनाच्या दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली.या प्रस्तावित मार्गांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रस्तावित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होणार असून मुंबईतील प्रवास कमीत कमी वेळात होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती