सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 जिल्हा

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; डिहायड्रेशनचा त्रास, दोन दिवस उपचार सुरू राहणार

डिजिटल पुणे    26-11-2026 14:09:13

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डिहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांना यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्वी दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना सोलापूर येथून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा सततचे दौरे आणि कामाचा व्याप यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. पवार साहेबांना डिहायड्रेशनचा त्रास झाला असण्याची शक्यता आहे. त्यांनी आता कामाचा वेग कमी करण्यासोबतच प्रवासही मर्यादित ठेवण्याची गरज आहे. मात्र, बाबा कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांना आपल्या कामावर प्रचंड प्रेम असून काम केल्याशिवाय ते राहत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

दोन दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहणार

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित असताना शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच त्या ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाल्या. डॉक्टरांनी शरद पवार यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा, प्रवास कमी करण्याचा आणि कामाचा वेग मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिल्याचे समजते. सततचे दौरे आणि कामाचा व्याप पाहता आता शरद पवार विश्रांती घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती