सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान म्हणजे आपली आचारसंहिता आहे. प्राचार्य डॉ. पंडित शेळके

डिजिटल पुणे    26-11-2026 14:20:20

पुणे  : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय,पौड रोड, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. पंडित शेळके, डॉ.शुभांगी औटी, डॉ.शोभा तितर, डॉ.सपना राणे, डॉ.श्रीनिवास इपलपल्ली, प्रा.नरेंद्र केदारी,प्रा. अरुण शिंदे, प्रा.भाऊसाहेब भोसले, डॉ.नानासाहेब पवार इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ पंडित शेळके म्हणाले "भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. भारतीय राज्यघटनेत ज्या ज्या अधिकारांच्या आधारे देशाची राजकीय तत्त्वं, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वं, निर्बंध आणि कर्तव्यं इत्यादी निश्चित केली गेली आहे तसेच देशाला सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते आणि देशातल्या नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रदान करते. ज्याप्रमाणे आपण अधिकाराचा वापर करतो त्याप्रमाणे संविधानात असलेल्या जबाबदाऱ्या देखील तेवढयाच तत्परतेने पाळल्या पाहिजेत संविधान म्हणजे आपली आचारसंहिता आहे. संविधान दिवस साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया".

 कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, डॉ.अशोक शेळके, प्रा.रचना कोळपे,प्रा. प्रिया आरडे, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ.रुपाली शेंडकर,प्रा.निकिता कदमबांडे, प्रा.कीर्ती करंजावणे, संजय कुंभार यांनी केले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती