सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 जिल्हा

पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आवश्यक निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    26-11-2026 17:09:22

मुंबई : पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. भविष्यातही नियम व कायद्याच्या चौकटीत पोलिसांचा स्वतंत्रपणे विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आयोजित केलेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील तसेच पहलगाम येथील शहीद जवान आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस कुटुंबांसाठी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २६ नोव्हेंबर हा संविधान दिन असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला अर्पण केलेल्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचबरोबर मुंबईवरील २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचाही हा दिवस आहे.

२६/११ चा हल्ला हा केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला हल्ला होता. पोलीस आणि सुरक्षा दलातील जवानांनी अतुलनीय शौर्याने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी प्राणांची पर्वा न करता कसाबला जिवंत पकडल्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मुंबई तेव्हाही थांबली नाही आणि कधीही थांबणार नाही. कोणताही दहशतवादी मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा निर्धार संपवू शकत नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पहलगाममधील हल्ला मानवतेला काळिमा फासणारा होता. भारताच्या जवानांवर किंवा नागरिकांवर होणारा कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कृतीतून दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल. पोलीस भरती, प्रशिक्षण, पोलीस पाल्यांचे प्रश्न आणि पोलीस कुटुंबांचे कल्याण यासाठी शासन सातत्याने निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती