सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • डिलिमिटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु, पक्षाच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य
  • बदलापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत! जीव वाचवण्यासाठी पळालेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
  • संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू
  • मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
  • पुण्यात १५ ऑगस्ट चौकात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
 जिल्हा

सायबर हल्ल्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी ‘एआय आधारित ऑटोनॉमस एसओसी’ तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण -देबज्योती गुहा

डिजिटल पुणे    27-11-2026 17:06:08

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या वापरामुळे सायबर हल्ल्यांचे स्वरूप अधिक प्रगत आणि गुंतागुंतीचे होत आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक सायबर सुरक्षा यंत्रणांच्या मर्यादा लक्षात घेता, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित सुरक्षा संचालन केंद्र (ऑटोनॉमस एआय सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर – एआय एसओसी) ही काळाची गरज बनली आहे. संस्थेच्या संपूर्ण माहितीची गोपनीयता आणि सार्वभौमत्व कायम राखत, इंटरनेटशिवायही कार्य करू शकणारे ऑन-प्रिमाइसेस एआय एसओसी तंत्रज्ञान सायबर सुरक्षेसाठी प्रभावी ठरू शकते, अशी माहिती ट्रेलिक्सचे सोल्यूशन्स इंजिनिअरिंगचे देबज्योती गुहा यांनी दिली.माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने (होस्ट पार्टनर) हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘एजंटिक एसओसी विदाऊट ट्रेड-ऑफ्स ऑर कॉम्प्रोमाइज’ या विषयावरील सादरीकरणात ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.गुहा म्हणाले की, सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक वेगाने आणि अत्याधुनिक पद्धतीने हल्ले करत आहेत. त्यामुळे पारंपरिक सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी ऑर्केस्ट्रेशन, ऑटोमेशन अँड रिस्पॉन्स यंत्रणांना प्रत्येक नव्या प्रकारच्या धोक्याची ओळख पटविणे आव्हानात्मक ठरत आहे. या यंत्रणा प्रामुख्याने पूर्वनिश्चित नियम, विश्लेषण आणि प्लेबुकवर आधारित कार्य करतात. मात्र, अनोळखी किंवा नव्या स्वरूपाच्या सायबर हल्ल्यांच्या वेळी मानवी हस्तक्षेप आणि सखोल तपासाची आवश्यकता भासते. ही मर्यादा दूर करण्यासाठी स्वयंचलित आणि संदर्भाधारित विश्लेषण करणारे एजंटिक एआय एसओसी विकसित करण्यात आले आहे.

या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रणाली संस्थेच्या स्वतःच्या डेटा सेंटरमध्ये कार्यरत राहते. त्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नसून, एअर-गॅप्ड वातावरणातही ते कार्य करू शकते. त्यामुळे संस्थेची संवेदनशील माहिती बाह्य क्लाऊडवर पाठविली जात नाही. माहितीची गोपनीयता, डेटा सार्वभौमत्व आणि नियामक अनुपालन यांचे संरक्षण करता येते. या प्रणालीमध्ये प्रामुख्याने इन्व्हेस्टिगेशन इंजिन, रेमेडिएशन इंजिन आणि हंटिंग इंजिन अशा तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे, असे श्री. गुहा यांनी सांगितले.

श्री. गुहा म्हणाले, विशेषतः संस्थेतील महत्त्वपूर्ण डिजिटल मालमत्ता, सर्व्हर, वरिष्ठ अधिकाऱ्यांची संगणकीय उपकरणे आणि इतर संवेदनशील यंत्रणा यांचे महत्त्व लक्षात घेऊन धोक्यांचे वर्गीकरण व प्राधान्यक्रम निश्चित करता येते. विविध सुरक्षा प्रणालींमधील माहितीचे परस्परसंबंध तपासून संभाव्य धोक्यांची अधिक अचूक ओळख पटविता येते. त्यामुळे सुरक्षा पथकाला असंख्य अलर्टमधून प्रत्यक्ष गंभीर घटनांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. परिणामी सायबर हल्ल्याला प्रतिसाद देण्याचा आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होते.एआय तंत्रज्ञानामध्ये चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारे निष्कर्ष (हॅल्युसिनेशन) निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विश्वासार्हता, अचूकता आणि परिणामकारकता या बाबींचा विचार करून या प्रणालीची रचना करण्यात आली आहे. तसेच व्हीएमवेअर आणि जीपीयू आधारित पायाभूत सुविधांवरही हे तंत्रज्ञान कार्यान्वित करता येते. पारंपरिक एआय प्रणालींमध्ये डेटा वापराचे प्रमाण, लॉग इनजेशन आणि टोकननुसार शुल्क आकारले जाते; मात्र ट्रेलिक्सच्या या प्रणालीमध्ये निश्चित वार्षिक सदस्यता शुल्काची व्यवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.

सायबर हल्ल्यांची वाढती व्याप्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बदलणारी हल्ल्यांची कार्यपद्धती लक्षात घेता, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र डिजिटल पायाभूत सुविधांनुसार कार्य करणारी, सुरक्षित आणि स्वयंचलित सायबर सुरक्षा यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे. ऑन-प्रिमाइसेस एजंटिक एआय एसओसीमुळे डेटा सुरक्षितता कायम राखून धोक्यांची ओळख, विश्लेषण, प्राधान्यक्रम आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास श्री.गुहा यांनी व्यक्त केला.

 


 Give Feedback



 जाहिराती