सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार गैरहजर राहणार, निलेश लंकेनीही ऐनवेळी बदलला निर्णय
 विश्लेषण

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

डिजिटल पुणे    28-11-2026 18:37:53

पुणे :  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.डॉ. विजय बालघरे यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ.अपेक्षा नाकतोडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी या प्रसंगी महात्मा फुले यांचे विचार कार्य यातून प्रेरणा घेत प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीचा वसा जपावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.चंदा हासे, सांस्कृतिक व विशेष दिन विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे, डॉ.विठ्ठल नाईकवाडी, डॉ.विजय घाडगे, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ.रमाकांत कसपटे, डॉ.सुभाष वाव्हळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व विशेष दिन समितीतील सदस्य प्रा.रुपाली बनकर, डॉ. विद्या पठारे, प्रा. शर्मिला देवकाते, प्रा.प्रवीण खाडे, श्री. सनी पावले यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम खोमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे यांनी केले


 Give Feedback



 जाहिराती